महसूल प्रशासनाने केला मध्यरात्री 'हायवा' जप्त

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : चोरट्या मार्गाने रेती तस्करांचा उच्छाद कायम असून महसूल विभाग कारवाईच्या मागावर असतांना भालेवाडी येथे काल मध्यरात्री एक हायवा ताब्यात घेतला, ह्या धडक कारवाई मुळे रेती तस्करात चांगलीच धडकी भरली आहे.
मारेगाव तालुक्यातील रेती तस्कर वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. किंबहुना बुधवारच्या मध्यरात्री ट्रॅक्टर,हायवा वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर आहे. दरम्यान, मध्यरात्री तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला हायवा मार्डी ते मारेगाव मार्गाने रेती भरून येणारा हायवा (MH-34 AV 0079) हे अवैध वाहन भालेवाडी येथे पकडण्यात आला. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला हायवा तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती आहे. ही कार्यवाही तहसीलदार निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी एस सी कुडमेथे व तलाठी व्ही बी सोयाम, गजानन वानखेडे व मंगेश बोपचे यांनी केली.
परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत.




महसूल प्रशासनाने केला मध्यरात्री 'हायवा' जप्त महसूल प्रशासनाने केला मध्यरात्री 'हायवा' जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.