आज मारेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि. 25 जानेवारी 2024 ला मारेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'भव्य पक्ष प्रवेश सोहळा' आयोजित करण्यात आला आहे.

सन्मा. पक्ष प्रमुख राजसाहेबांचे विचार व नेते मा. राजूभाऊ उंबरकर याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मारेगाव तालुक्यातील शेकडो महिला पक्षप्रवेश करणार आहे. गोरगरिबांचे कैवारी व त्यांच्या मूलभूत अडीअडचणी ची जाणीव असणारे नेते म्हणजेच मनसे नेते राजूभाऊ उंबरकर अशी ग्रामीण भागात उंबरकरांची ओळख आहे. राजू उंबरकर यांच्या धडाकेबाज कार्यावर, नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो महिला आज पक्षात प्रवेश करणार आहे, त्या अनुषंगाने आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा येथील शेतकरी सुविधा मंगल कार्यालयात सकाळी 11 वा. आयोजित केला आहे, असे तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांनी सांगितले. 
          
हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, मारेगाव शहर अध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, सुरज नागोसे, अनिल गेडाम, व पदाधिकारी मेहनत घेत आहे.
आज मारेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा आज मारेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.