सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
तसे विधवा, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल लाभ प्राधान्याने देण्यासाठी शासनाचे जी आर सांगते. त्या अनुषंगाने त्या महिलांची मागणी होती. परंतु सरपंच सचिव हे मनमानी कारभार करित असल्यामुळे विधवा, भूमिहीन लाभार्थ्यांना योजनेचे घरकुल डावलून शेतकरी सक्षम लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचा आरोप उपोषण कर्त्या महिलांनी यापूर्वी सुद्धा मागील निवेदनातून केला होता.
सरपंच सचिव तथा गटविकास अधिकारी यांना घरकुल लाभ मिळावा यासाठी या महिलांनी अनेकदा विनंती लेखी मागणी केली, परंतु प्रशासनाने थातूर मातुर वेळ काढत उलट लाभार्थ्यांना गेट आऊट, लाखों रोज तक्रारी येतात, आम्ही कुठे कुठे लक्ष द्यायचे अशा भाषा वापरल्याने दुखावलेल्या महिलांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.
वणी मतदान संघातील सामाजिक कार्यकर्ते गीतघोष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपोषणाला विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा देऊन आपला अभिप्राय नोंदवून उपोषणकर्त्याची भेट घेतली. यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, काँग्रेस तालुका तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, माजी आमदार वामनराव कासावार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर मारेगाव पंचायत समिती बिडीओ भीमराव व्हनखंडे, जाधव साहेब इत्यादी पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आश्वासित केले. येणाऱ्या 26 जानेवारी रोजी ग्रामसभेत घरकुलाचा तुमच्या नावाचा मुद्दा आम्ही मांडू अशा प्रकारचे लेखी पत्र देऊन तुमच्यावर अन्याय होणार नाही असे सांगून उपोषणकर्त्याची समज काढून तुम्ही उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली उपोषणकर्त्यांनी विनंतीला मान देऊन सर्व पदाधिकाऱ्यासमोर राजकीय पुढार्यापुढे शरबत घेऊन उपोषण सोडले.
पंचायत समिती कडून लेखी आश्वासन दिल्यानंतरच "त्या" विधवा निराधार महिलांचे उपोषण सुटले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 24, 2024
Rating: