वणी : सहकार क्षेत्रातील पणन महासंघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची समजली जाते. वणी मतदार संघातील झालेल्या निवडणुकीत केवळ दोन प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकल्याने, या चुरशीच्या निवडणुकीत वसंत जिनिंगचे संचालक तथा वणी झोन मधून श्री रंगनाथस्वामी अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी एकतर्फी दणदणीत विजय मिळवला.
पणन महासंघ मुंबई संचालक पदाच्या निवडणुकीत 11 मतदारांपैकी 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असता यामध्ये संजयभाऊ खाडे यांना 7 मते मिळाली तर, प्रतिस्पर्धी शेखर धोटे याना 3 मते मिळाल्याने प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडविला व संजय खाडे हे यथोचिरित्या बहुमताने निवडून आलेले आहेत.
यापूर्वी संजय खाडे यांनी वसंत जिनिंगच्या निवडणुकीत संचालकपदी विराजमान झाले, आज महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. नागपुरच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल श्री.खाडे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांच्या मित्र परिवारातील प्रा.डॉ. शंकरराव वहाटे, तेजराज बोठे, जयसिंगराव गोहोकार, राजू अंकीतवार, पुरुषोत्तम आवारी, राजेंद्र कोरडे, प्रमोद वासेकर यांनी सुद्धा हार्दिक अभिनंदन केले.
संजय खाडे यांच्या विजयाच्या अनुषंगाने त्यांचा आज दुपारी 4 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत तथा सत्कार समारंभ त्यांच्या मित्र परिवारातर्फे होणार आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पणन महासंघाच्या निवडणुकीत संजय खाडे यांचा दणदणीत विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 09, 2024
Rating: