सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगावात बस स्थानकाच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीला घेऊन नगर पंचायत, कम्युनिस्ट पक्ष, एकता बहुउद्देशीय संस्था, व भारतीय जनता पार्टी मारेगाव, या प्रमुखांच्या उपस्थितीत वणी विधानसभेचे विकास पुरुष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना आज निवेदन देण्यात आले.
गेल्या 15 ऑगस्ट पूर्वी झालेल्या विश्रामगृहामधील सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमदार बोदकुरवार यांनी 15 ऑगस्टचे आंदोलन मागे घ्यावे, लोकप्रतिनिधी च्या शब्दाला मान देऊन आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुद्धा मागे घेतले होते. त्याच वेळी बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले होतं की, तीन ते चार महिन्यानंतर (2024) मध्ये बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही दिली. विधानसभेत कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळख आहे. त्यामुळे आपल्या नेतृत्वात नवीन बस स्थानकाची निर्मिती व्हावी अशी शहर वासियांसह, या करिता नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की, कॉ. बंडू गोलर, संस्थापक अध्यक्ष अजय रायपुरे व भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत आमदार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. त्यामुळे आता मागणी कर्त्यांना शहरात बस स्थानक व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी बस स्थानक नसल्याने प्रवाश्याना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय, यात विशेषतः महिला, विद्यार्थ्यांना रस्त्यावर थांबण्यासाठी तारेवरची करसत करावी लागत आहे. किरकोळ अपघातांना सामोरे जावं लागतेय,ही अतिशय खेदजनक बाब आहे. त्यामुळे विषयाकडे लोकप्रतिनिधी म्हणून आपण गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर बस स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात करावी अशी सर्वानुमते आग्रही विनंती सह मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना नगराध्यक्ष नगर पंचायत मारेगाव, कम्युनिस्ट पक्ष, एकता बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष मारेगाव, व तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मारेगाव, या सर्व प्रमुखांची उपस्थिती होती. यासाठी नवनिर्वाचित भाजपाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचाही पुढाकार तथा आग्रह असल्यामुळे निश्चित येथील बस स्थानकाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागणार याकडे मागणी तालुका वासियांच्या नजरा खिळल्या आहे.
मारेगाव बस स्थानकाच्या कामाला सुरूवात करण्यासाठी शहरवासियांसह भाजपा तालुका अध्यक्षांचीही मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 09, 2024
Rating: