कोसारा मार्गांवर अवैध कोल डेपो

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा या मार्गांवर अवैध कोळशाचा डेपो थाटून येथे राजरोसपणे कोळसा तस्करी जोमात दिसून येत आहे. कोसारा घाट तसा अवैध तस्करीसाठी कुपरिचित आहेच. कोसारा गावाजवळच चंद्रपूर जिल्ह्यातून वरोरा मार्गे येणाऱ्या कोळसा वाहक ट्रकमधून कोळसा चोरून किंवा कमी दरात विकत घेऊन गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करत आहे. सोबतच परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे व सामान्य जनतेला श्वसन संस्थेशी संबंधित आजाराच्या खाईत ढकलत आहे.

मारेगाव तालुक्याचे शेवट चे टोक असलेल्या कोसारा मार्गांवरील कोलडेपो, अगदी वर्धा नदी च्या काही अंतरावर असून मोठया प्रमाणात कोळसाची तस्करी केली जात आहे. या डेपोत एकोणा,वणी क्षेत्रातील ट्रक कोळशाची भरीव चोरी करून खुल्या बाजारात विक्रीकरिता आणले जातात. किंबहुना येथून चोरीच्या कोळशाची हेराफेरी केली जाते.

विशेष उल्लेखनीय की, गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी हा गोरखधंदा चालू असताना ह्या अवैध चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल डेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
कोसारा मार्गांवर अवैध कोल डेपो कोसारा मार्गांवर अवैध कोल डेपो Reviewed by सह्याद्री चौफेर on January 09, 2024 Rating: 5
Powered by Blogger.