टॉप बातम्या

श्रीकांत पोटदूखे यांची सलग दुसर्‍यांदा भाजपा वणी शहर अध्यक्षपदी निवड

सह्याद्री चौफेर | दिगांबर चांदेकर

वणी : माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराजभैय्या अहिर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार,भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा वणी शहर अध्यक्षपदी श्रीकांत पोटदूखे यांची सलग दुसर्‍यांदा निवड करण्यात आली आहे.

श्रीकांत पोटदूखे हे मागील अनेक वर्षापासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून मागील सलग पाच वर्ष वणी नगरपरिषदेचे उपाध्यक्षपद व नियोजन विभागाचे सभापती पद त्यांनी भूषविले आहे, त्यांच्या नियुक्तीबद्दल वणी शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांच्या वतीने स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
Previous Post Next Post