मारेगावात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून अनॉलाटिकल टेस्टिंग अँड रिसर्च लेबॉटरी ,जळगाव तसेच जिल्हा परिषद यवतमाळ यांचे सुचनेनुसार मारेगाव पंचायत समिती शिक्षण विभाग मारेगाव यांच्या सहकार्याने येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये (ता.४) रोजी एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यात खिचडी शिजविण्यासंबंधी दक्षता कोणती घ्यावी, भांडे कसे साफसुत्र असावे, याबाबत मार्गदर्शन जळगाव येथील प्रशिक्षणार्थी सतनेल पारसमल यांनी आपल्या अनुभवातून, त्याचप्रमाणे कार्यातून मदतीस यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. हा उपक्रम केंद्र सरकारचा असून या प्रशिक्षणाला पंचायत समिती मारेगाव येथील कर्मचारी श्रीधर कयापाक बीआरसी, अखिल नागपुरे, तसेच शिक्षण विभागातील चव्हाण सर यांनी वरील कार्यशाळेला सहकार्य केले.

या एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेत तालुक्यातील खिचडी शिजवण्याऱ्या मदतनीसांनी सहभागी होऊन हे प्रशिक्षण आनंदात पार पाडले.
मारेगावात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न मारेगावात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.