सह्याद्री चौफेर | दिगांबर चांदेकर
वणी : शहरातील एका दाम्पत्याचा दुचाकीने जात असतांना भरधाव ट्रकने जबर धडक दिली, यात 60 वर्षीय माहिलेचा मृत्यू झाला. ही
घटना आज 5 जानेवारी रोजी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान वडगाव फाट्या जवळ घडली. या झालेल्या अपघातात ट्रक वाहन चालकाने अतिवेगात वाहन चालून मोटरसायकलला धडक दिली,जबर धडकेने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडले तर सोबत असलेली त्यांची पत्नी रस्त्यावरच पडल्याने मागून येणारा ट्रक महिलेच्या अंगावरून गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
उत्तम भोंगळे रा. रविनगर (वणी) येथील रहिवासी असून ते आज वरोरा येथील त्यांच्या एका नातेवाईकांचे लग्न समारंभासाठी शाईन कंपनी (MH29-BW 1749) या दुचाकीने त्यांच्या पत्नी छंबूताई भोंगळे यांच्यासह निघाले होते, त्या दरम्यान वडगाव टी-पाॅईंट जवळ झालेल्या या दूदैवी घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकरीता ग्रामीण रूग्णालय वणी येथे पाठविण्यात आला, या अपघातात कारणीभूत ठरलेला ट्रक क्र.MH 34-BG-3647 पोलीसांनी ताब्यात घेऊन पसार झालेला ट्रक चालकाविरूद्ध भादविच्या कलम 279, 337, 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे.
ट्रकच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 05, 2024
Rating: