भाजपाकडून नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारतीय जनता पार्टी मारेगाव च्या वतीने आज दि. 2 जानेवारी 2024 रोजी मा. संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी विधानसभा व भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक जेष्ठ नागरिक सभागृह येथे आजी-माजी तालुकाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मावळते भाजपा तालुकाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर चिकटे यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अविनाश लांबट यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी पक्षाचे संघटनात्मक काम व नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या पाठीशी राहून पक्ष संघटना मारेगाव तालुक्यात जास्तीत जास्त वाढविण्याचा प्रयन्त केला पाहिजे असे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थितीत सर्वानुमते ठरले. दरम्यान इतरही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

भारतीय जनता पार्टी ला मारेगाव तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेला, युवा चेहरा मिळाल्याने तरुणांई मध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या बैठकीला जिल्हा किसान सेल, शिक्षण आघाडी सेल, युवा मोर्चा, व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाकडून नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा सत्कार भाजपाकडून नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on January 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.