सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्य समता सैनिक दल तालुका शाखा मारेगाव तर्फे २०६ व्या शौर्य दिनाचे आयोजन दि.१ जानेवारी २०२४ रोज सोमवार ला सकाळी ११ वा. प्रबुद्ध परिसर, चिंचमंडळ येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प-माल्यार्पण व बुद्ध वंदना घेऊन मानवंदनेला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात समता सैनिक दल मारेगाव तालुका संघटक मार्शल प्रकाश ताकसांडे सर व बौध्द स्मारक समिती, चिंचमंडळ चे अध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर देठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा-कोरेगाव येथील महापराक्रमी शूरवीर सैनिक योद्ध्यांना अभिवादन करून विजयीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
या मानवंदना कार्यक्रमास समता सैनिक दल तालुका युनिट चे पदाधिकारी व चिंचमंडळ, मार्डी-केगाव, बांबर्डा, बुरांडा, नरसाळा येथील मार्शल्स तसेच बौद्ध स्मारक समिती चे पदाधिकारी व बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.
समता सैनिक दल तालुका शाखा मारेगांव द्वारा भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्त चिंचमंडळ येथे मानवंदना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 02, 2024
Rating: