सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : भद्रावती तालुक्यातील विजासन बुद्ध लेणी येथील तथागत भगवान गौतम बुद्ध रूपाची विटंबनेचा मारेगाव येथील फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच च्या वतीने निषेध व्यक्त करीत समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती विजासन बुद्ध लेणी जगात प्रसिद्ध आहे. येथील लेणीत असलेल्या अखिल विश्वाला शांती, मैत्री, करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या मूर्तीची जातीयवादी समाजकंटकाकडून 1 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री विटंबना करण्यात आली. सकाळी आंबेडकरी अनुयायांच्या ही बाब निदर्शनास येताच संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचे मारेगाव येथे पडसाद उमटून जाहीर निषेध करण्यात आला.
मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्फत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात हेतु पुरस्पर केलेल्या विटंबनेचा तिव्र निषेध करून जातीय सलोखा बिघडवून समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई व मारेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि बुद्ध विहाराला संरक्षण पुरविण्यात यावे मागणी करण्यात आली.
यावेळी विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, ज्ञानेश्वर धोपटे,चांद बहादे, राजू बदकी, शब्बीर खान पठाण, साहेबराव नागोसे, प्राणशिल पाटील, गणेश सोयाम आदींची उपस्थिती होती.
जातीयवादी समाजकंटकांकडून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2024
Rating: