दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने एकाला पकडले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने मारेगाव पोलीस हद्दीतून चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई १६ जानेवारी रोजी करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे किरण पेट्रोल पंप पांढरकवडा रोड येथे सापळा रचला. यावेळी एक तरुण (एमएच-३२-एएन-१३७१ क्रमांकाची होंडा कंपनीची ड्रीम युगा काळ्या रंगाची लाल पट्ट्याची मोटारसायकल विकण्याचा प्रयत्न करत होता.

या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठांकडून माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तरुणाची चौकशी सुरू केली. गणेश पांडुरंग कुळमेथे ऊर्फ गणेश भाऊराव घोडाम (३५) रा. इंदिरा आवास घाटी परिसर (ता.घाटंजी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरट्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या दुचाकी मारेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या व त्याला पुढील कार्यवाहीस मारेगाव पोलीससाच्या स्वाधीन केले.

ही कारवाई पुलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पुलिस अधीक्षक पीयूष जगताप, पुलिस निरीक्षक आधार सिंह सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल मोहनकर, अमोल मुडे, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, नीलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली.
दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.