वाळू चोरी गेल्याची तलाठ्यांची पोलिसात तक्रार, दोन तरुणांवर गुन्हे दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील निवडक घाट तूर्तास बंद असून रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. अशातच मारेगाव तहसीलदार यांच्या व्यूव्हरचनेने अलीकडेच तस्करांचे कंबरडे मोडले आहे. सोमवार ला सिंधी ते माळ पांदण रस्त्यावर ट्रॅक्टरने वाळू चोरून नेल्याची चक्क तक्रार दोन ट्रॅक्टर मालकाविरोधात सबंधित तलाठ्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन ला दिली, त्यानुसार आरोपी विरोधात विविध कलमानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला.

प्राप्त तक्रारीनुसार सिंधी (महागाव) येथील तलाठी विवेश भाऊराव सोयाम हे शासकीय कार्यालयीन कामाकरिता गेले असता कोतवाल यांना 15 जानेवारी ला मोबाईल वर रेती चोरून नेत असल्याची माहिती मिळाली. कोतवाल राजू गायकवाड, अमित कोयचाडे व तलाठी चैतन्य कुमार शिंगणे हे कर्मचारी सिंधी ते माळ पांदण रस्त्यावर 11.30 गेले असता आढळून आलेल्या माहितीनुसार पोलिसात सचिन पचारे रा.कोसारा व शुभम भास्कर पालकर रा चिंचमंडळ यांच्या विरोधात एक ब्रास वाळू अंदाजे किंमत 4500/- घेऊन पळाल्याची तक्रार दिल्याने मारेगाव पोलिसांनी यांचे वर भांदवी कलम 379 सह कलम 3/4 गौण खनिज नुसार चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील सुरु आहे.

करणवाडी फाट्यावरील घडलेल्या घटनेचं काय?

तालुक्याच्या टोकाला असलेल्या वर्धा नदी पात्रातून अवैध रेतीची तस्करी करणाऱ्यावर महसूल विभागाची करडी नजर ठेवत अवैध वाहतूक वाहनावर दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरु आहे. धनदंडग्यावर कृपादृष्टी आणि सर्वसाधारण वर कारवाई, असा रोष जनतेतून व्यक्त होत असताना काही दिवसाअगोदर करणवाडी फाट्यावर महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना चक्क! धारदार शस्त्रे दाखवून जीवावर उठून रेती पळवून नेली. परंतु महसूल विभागाकडून या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने, व गावातील शेतकरी पुत्रांच्या विरोधात गुन्हा नोंद करणारे महसूल प्रशासन करणवाडी (फाटा) प्रकरणात मुंग गिळून गप्प? वरील नमूद तक्रारी च्या अनुषंगाने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.






वाळू चोरी गेल्याची तलाठ्यांची पोलिसात तक्रार, दोन तरुणांवर गुन्हे दाखल वाळू चोरी गेल्याची तलाठ्यांची पोलिसात तक्रार, दोन तरुणांवर गुन्हे दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.