कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करा - शिवसेना तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकार यांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा रेती घाटातून हजारो ब्रॉस रेतीचे उत्खनन डेपो ओपनिंग झाल्यापासून सर्वश्रुत आहे. अशातच मागील आठवड्यात करणवाडी फाट्यावर रेती तस्कराने रात्रीच्या सुमारात महसुल अधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने जिवघेणा हल्ला चढविल्याबाबतच्या तालुक्यात चर्चा आहे. मात्र, तहसिलदार व महसुल यांचेकडून या गंभीर घटनेची पोलीस दरबारी कोणतीही तक्रार दिली नाही. त्यामुळे कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करणे व शासनाचा महसूल बुडवणाऱ्या दोषी वर कार्यवाही करा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील निवडक घाट तूर्तास बंद असून वाळू तस्करांचे चांगलेच फावत असताना तहसिलदार यांच्या आशिर्वादाने हे सर्व प्रकार सुरु असल्याचा आरोप करत मागील डिसेंबर महिण्यात एका नायब तहसिलदाराने प्रत्यक्ष पोकलैंड मशिन व इतर साहित्य मंडळ अधिकारी, तलाठी कोसारा, पोलीस पाटील यांच्या समक्ष जप्ती करुन सुपुर्द करुन कार्यवाही नायब तहसिलदारव्दारे कार्यवाही रफादफा करण्यात आल्याचा आरोप शिवसेचे तालुका अध्यक्ष विशाल मनोहर किन्हेकार यांनी केला आहे. तसेच आज रोजी कोसारा रेती घाटावर वजनमाफ लावण्याचे काम सुरु आहे असेही त्यांनी म्हटलं आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि, यापूर्वी या ठिकाणाहून आतापर्यंत हजारो ब्रॉस रेती चोरी गेल्याचा अंदाज आहे. तहसिलदार यांच्या आशिर्वादाने सर्व प्रकार सुरु असल्याने या सर्व बाबीची सखोल चौकशी करुन शासनाचा बुडालेला कोटी रुपयाचा महसुल याची चौकशी करुन यात तहसिलदार व महसुल अधिकारी दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी, अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोसारा घाटावर तहसिलदार प्रत्यक्ष रात्रीच्या सुमारास गस्त घालतात, यावेळी मोठमोठे वाहने उभे असताना त्यावर कार्यवाही नाही,यामुळे प्रशासनाच्या संशयास्पद कार्य प्रणाली वर तसेच वरील सर्व नमूद बाबींची सखोल चौकशी करुन दोषी वर कडक कारवाई करावी, येत्या २६ जानेवारीच्या आत कार्यवाही करुन करणवाडी फाट्यावर व मार्डी येथे २४ तास चेक पोस्ट लावून सर्वसामान्यांना न्याय द्यावा व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांवर होत असलेल्या तहसिल कार्यालयाकडून आकसाच्या कार्यवाया थांबवाव्या अशी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकार यांनी मागणी केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी, मारेगाव ठाणेदार यांनाही तशा प्रतिलिपी दिल्याचा निवेदनात उल्लेख आहे.

कोसारा नदीपात्रात फार मोठ्या प्रमाणात रेती मशिनने काढल्यामुळे फार मोठेमोठे खड्डे पडले आहे, तेव्हा रेतीची हेराफेरी झाली असे सिध्द होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वरील मागणीची दखल घेऊन तत्काळ चौकशी करावी,अन्यथा येत्या २६ जानेवारी ला तहसिल कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा,थेट ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करा - शिवसेना तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकार यांची मागणी कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करा - शिवसेना तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकार यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.