सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : जेसीआई वणी सिटी हे एक सामाजिक संस्था आहे, जे तरुण सक्षमिकरणासाठी कार्य करते. JCI च ध्येय आहे तरुणांमध्ये नेतृत्व गुणवत्ता प्रस्थापित करणे. ज्यासाठी ते सतत कार्यरत आहे.
१५ जानेवारी २०२४ ला JCI चा ११ वा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला. यात जेसी यश श्रीवास्तव अध्यक्ष तर जेसी जयंत पांडे सचिव आणि जेसी नमिष काळे कोषाध्यक्ष म्हणून निवडून आले. जेसी रोनित गुंडावर, जेसी अमोल गायकवाड, जेसी सुमित कुरेवार, जेसी अभिषेक चौधरी, जेसी कार्तिक देवळे आणि जेसी संजीव कुमार गुप्ता यांनी डायरेक्टर पदाची शपथ घेतली.
वणीचे लाडके व्यक्तिमत्त्व व्यावसायिक समाजसेवक जेसिआई वणीचे भूतपूर्व अध्यक्ष विजयबाबू चोरडिया मुख्य अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते, मुख्य वक्ता जेसिआय वणी चे सर्वेसर्वा पूर्व आंचल अध्यक्ष जेसी नरेंद्र बरडीया, अतिथी म्हणून आंचल अध्यक्ष जेसी प्रतीक सारडा पुर्व आंचल अध्यक्ष जेसी सौरभ बरडिया यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाला चार चाँद लावले, सर्व सदन चा उत्साह वर्धन करून नविन ऊर्जेची भावना अनावर केली.
मुख्य अतिथी श्री विजय बाबू जी चोरडिया यांनी सभेचे उत्साह वर्धन करत सामाजिक कार्यक्षेत्रात अजून पूर्जोर मेहनत करण्याचा सल्ला दिला. JCI वणी सिटी चे प्रेरणास्थान नरेंद्र बरडिया यांनी सदनाचे आभार व्यक्त करत एकत्रतेची शिकवण दिली. या प्रसंगी रोटरी क्लब वणी आणि लायन्स क्लब वणी सामाजिक संस्थानांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
२०२३ चे अध्यक्ष जेसी नाविन पोपली यांनी २०२३ च्या कार्याची प्रस्तावना समस्त सदनासमोर मांडली, ज्याला सदनेतर्फे उतोउत प्रतिसाद मिळाला. सर्वांनी जेसी नवीन पोपली यांच्या कार्यशैलीची आवर्जून कौतुक केले.
सर्व माजी अध्यक्ष व सदस्य यांनी पुरजोर श्रम करून कार्यक्रमाचे सफल आयोजन केले.
JCI वणी ने नवीन विक्रम गाठत तब्बल १४ नवीन सदस्य संस्थेला जोडले. यात समस्त कार्यकारिणी व नवनिर्वाचित अध्यक्षांचा व कोषाध्यक्ष यांचा प्रचंड सहभाग होता. नवीन सदस्य मध्ये आशिष डंभारे, पंकज कासावर, गणेश कावरे, करिश्मा कावरे, अजय मुथा, प्रणव डाहुले, वैशाली डाहुले, पंकज बिलोरिया, प्रिती बिलोरीया, निखिल ताजने, स्विटी ताजने, अजय कोडगिरवार, रुपाली कोडगिरवार, यांचा समावेश करण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी जेसी डॉ. अक्षय तुगनायत (VZP), जेसी रवि हणमंते (IPP), व इतर सभासदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
जेसीआई चा ११ वा पदग्रहण सोहळा साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 17, 2024
Rating: