रात चांदना येथे तात्काळ माती परिक्षण व जमिनीतील बुरशीजन्य नियंत्रण उपाय मार्गदर्शन शिबिर

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

यवतमाळ : "शेतकरी प्रथम" अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतीशील गाव रातचांदणा येथे हनुमान मंदिरात गावातील शेतकऱ्यांना तात्काल "माती परीक्षण "व जमीनीतील बुरशीजनय रोगांवर नियंत्रण मिळविण्या करिता मार्गदर्शन करण्यात आले. 

माती परीक्षण अहवाल तात्काल वितरित करून आताच रब्बी हंगामातील रासायनिक खतावरिल खर्च कमी करून प्रत्यक्ष उत्पन्न जास्त कसे मिळेल यावर हरिविजय राठोड ,शेतकरी प्रथम चे प्रवर्तक यांनी मार्गदर्शन केले. 

प्रसंगी शुभम बेंडे ,ग्राम पंचायत सदस्य , ओमप्रकाश बेंडे ,हर्षल,चंद्रशेखर राऊत मुरझडी,दामोदर बेंडे,शंकर हेमणे,राम बेंडे ,कमलाबाई ,संगीताबाई ,प्रभाकर डोणाडे ,किसान बेंडे व गावातील असंख्य शेतकरी बाधंव उपस्थित होत. शिबिर यशस्वी होण्या करिता युवा शेतकरी शुभम बेंडे व त्यांच्या सहकार्यानी मदत केली.
रात चांदना येथे तात्काळ माती परिक्षण व जमिनीतील बुरशीजन्य नियंत्रण उपाय मार्गदर्शन शिबिर रात चांदना येथे तात्काळ माती परिक्षण व जमिनीतील बुरशीजन्य नियंत्रण उपाय मार्गदर्शन शिबिर Reviewed by सह्याद्री चौफेर on January 15, 2024 Rating: 5
Powered by Blogger.