सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदोला चारगाव मार्गे विदेशी दारू अवैद्य जात असल्याची गोपनिय माहिती शिरपूर पो,स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली,त्या माहितीच्या आधारे शिरपूर पोलीस पथकांनी चारगाव चौकी येथे (ता.14) जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान सापळा रचून नाकाबंदी दरम्यान एक डस्टर कार क्रमांक (एम एच 29- ए आर1638) ही कार वणी कडून शिंदोला मार्गे येत असताना दिसली,सदर वाहन थांबवून झडती घेतली असता त्या वाहनात विदेशी दारू आढळून आली. सदर वाहन चालक राजू मारोती अलीवर रा. गायकवाड नगर (वणी) याला सदर अवैद्य दारू वाहतूकी सदर्भात विचारपूस केली असता त्यातील दारू शेख अारिफ शेख इब्राहिम याच्या मालकीची असल्याची कबूली दिली. वाहन ताब्यात घेवून कारची पाहणी केली असता त्यात RS कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 72 बॉटल त्यांची किंमत 12 हजार 960 रूपयाचा अवैद्य दारू साठा व चारचाकी वाहन 5 लाख असा एकून 5 लाख 12 हजार 960 रूपयाचा मुद्देमाल शिरपूर पोलीसांनी जप्त करण्यात आले.
वाहन चालकास अटक करून दोघांविरूद्ध महाराष्ट दारूबंदी कायदा 65 (अ) (इ)व कलम 109 भादविनूसार गुन्हा दाखल केला आहे, सदरची कार्यवाही शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सूगत दिवेकर,आशिष टेकाडे, राजन इसनकर, अंकूश कोहचाडे यांनी केली आहे.