सागर मुने निर्मित बालनाट्याचा दुसरा क्रमांक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात नाट्यकलेच कार्य मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. नुकतेच चंद्रपूर येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत "अजूनही चांदरात आहे" हे दोन अंकी नाटक सादर केले. यात गुणवत्ता प्रमाणपत्र अपूर्वा खनगन हिला मिळाले व चंद्रपूर येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बालनाट्य स्पर्धेमध्ये वणीतील बालनाट्य कलावंतांनी गौरव खोंड लिखित पुस्तकाच्या पानातून हे बालनाट्य सादर केले.

या बालनाट्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून, यामध्ये संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी बालनाट्याची निर्मिती केली असून या बाल नाटकाचे दिग्दर्शन, पार्श्व संगीत दिले होते. पुस्तकाच्या पानाच्या उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय पारितोषिक सागर मुने यांना व उत्कृष्ट बाल अभिनेत्री तृतीय क्रमांक माही खुसपूरे हिला प्राप्त झाला आहे. बाल नाटकामध्ये सोनाक्षी खुसपुरे, गुंजन चांदेकर, तेजेश्वर खुसपुरे, रिद्धी बोरकर, आम्रपाली किनाके, आर्यन पवार यांनी भूमिका केल्या. हे सर्व बालकलावंत वणी शहरातील वेगवेगळ्या शाळेतील असून या सर्वांचे शहरात कौतुक केले जात आहे.
सागर मुने निर्मित बालनाट्याचा दुसरा क्रमांक सागर मुने निर्मित बालनाट्याचा दुसरा क्रमांक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 14, 2024 Rating: 5
Powered by Blogger.