चला वेदनांच्या ओठांवर 'स्माईल' आणूयात..!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जीवनाच्या प्रवासातील काही घटना आपल्याला बरंच काही शिकवत असतात. कित्येकदा त्या घटना असह्य वेदना देऊन जातात आणि साक्षीदार फक्त आपणच असतो. 
इतरांकारिता आपले दुःख, वेदना दुर्लक्षित राहतात. कारण बरेच जण आपले दुःख वेदना गांभीर्यानं घेत नाहीत. कारण ते स्वतःला सहन करावं लागतं त्यांना नाही.  जवळचेसुद्धा ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. समजून घेण्याकरिता फक्त शब्द म्हणून ऐकावं लागतं. असं नाही तर त्या भावना म्हणून समजून घ्यावं लागतं.विचार करावा लागतो. बारकाईने परिस्थिती समजून घ्यावी लागते. आलेले चांगले वाईट अनुभव हे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात.अनुभव आयुष्यभराची शिदोरी असते; परंतु तुम्ही दिलेल्या वाईट अनुभवांमुळे जर कोणालाही असह्य वेदना झाल्या असतील तर वारंवार चुका अपेक्षित नाहीत.जर तसं झालं तर ती व्यक्ती फक्त आठवण म्हणून असेल आणि शांततेत दूर गेलेली व्यक्ती जवळजवळ परत येण्याची शक्यता फार कमी असते. व्यक्ती दूर झाली तरीही प्रेम जेव्हा एकमेकांच्या आत्म्याशी झालेले असते तेव्हा ते कायम शेवटपर्यंत सोबत असतेच.

आपल्या भावना, आपली दुःखं, आपलं आपल्याशीच झालेलं हितगूज किंवा मग आपली मागं पडलेली स्वप्नं या सगळ्यांचे आपणच एकमेव साक्षीदार असतो. अनुभव आयुष्यातील  चढ-उतारांची जाणीव करून देत असतं,  दुःखानंतर सुख येतंच, फक्त संयम राखा हे सांगून जातं. अनेकदा माणूस माणसांनी वेढलेला असूनही एकटा होतो. तेव्हा हाच कोपरा आपल्या सोबती, सखा होतो. इथं आपण एकटे सांगणारे आणि एकटाच ऐकणारे असतो. तरीही हा मूक संवाद सुखावह असतो. आपलंही कुणी तरी ऐकतं, ही जाणीवच मनाला सुखावून जाते. अपेक्षा कुठलीच नसते. असते इच्छा फक्त, व्यक्त होण्याची आणि तेव्हा हाच कोपरा आपल्या मदतीला धावतो. तसं तर सगळं घरच आपलं असते ; पण मनाचा एक हळवा कोपरा असतो,तसा हा घराचा एक हळवा कोपरा आहे. असं म्हणतात शब्दांचा संवाद तसा खूप असतो, पण मूकपणे ऐकणारा क्वचितच भेटतो, आपलं म्हणणं सांगणारे खूप भेटतात, 
आपलं ऐकणारा मात्र क्वचितच भेटतो!

असं म्हणतात की प्रेमापेक्षा वेदनेचं नातं जास्त घट्ट असावं. जो तुम्हाला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त  संभाळतो, आयुष्य  समजतो. तुमच्या डोळ्यात अश्रु न यावेत याकरिता वाटेल ते प्रयत्न करतात. तुमच्या खराब वागणुकीमुळे त्यांना वेदना होतात या वेदना का दिसत नाही तुम्हाला ? असं म्हणतात विचारांची रात्र व खोलवर वेदांनचे चटके हे आयुष्यभर लक्षात असतात. 

आयुष्यात कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं, मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशास तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की, आपल्याला त्या भावना मोकळ्या मनानं मांडता येत नाहीत कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर तशी व्यक्तीच सापडत नाही. सापडली तरी ती समजून घेईलच असंही नाही. जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा सोबत असेल असंही नाही. ही अशीच अनेक दुःख मनात ठेवून आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. म्हणूनच तर वपुंच्या या ओळी मनाला स्पर्श करतात...... 

"जगाचा निरोप घेताना माणूस येथून काहीही नेऊ शकत नाही. यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली; पण सांगता न येणारी असंख्य दुःखं तो आपल्याबरोबर नेतो!"

माणसाला असह्य वेदना होतात. तेव्हा त्याचं मानसिक संतुलन ढासळतं. तो पूर्णपणे मूर्ख बनतो. जेव्हा प्रेमात पागल होऊन पूर्णपणे समर्पित होतो. व्यवहार न समजता भावना म्हणून समजतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा त्याला प्रेम होते व अशी व्यक्ती जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून वारंवार दुखविली जाते आणि त्यामुळं मनावर आघात होतात. असह्य वेदना त्याला सहन कराव्या लागतात. कोणीही स्वतःहून त्रास करून घेत नाही. तर त्याला नकळत वेदना होत असतात. जसं आई रडली की मुलाला त्रास होतो. मुलगा रडला तर आईला दुःख होतं एकदम तसंच. 

एखादी व्यक्ती तुमच्यावर जेव्हा प्रेम करते, ज्या व्यक्तीसाठी खूप खास असता मग तो तुमचा मित्र, मैत्रीण, प्रेयसी, प्रियकर कोणीही असू शकतो. खास करून अशा व्यक्तींना बिलकुल हलक्यात घेऊ नका. कारण तुमची अत्यंत खराब वागणूक, बोललेले खोटे शब्द, लपविलेल्या गोष्टी व चुकीच्या व्यवहारामुळे त्यांना अत्यंत वेदना होतात. खरंच असह्य अशाच असतात. असं असूनही जेव्हा ती व्यक्ती अत्यंत नम्रपणे तुमच्याशी वागते, सर्व सहन करते का ? उलट ती तुमच्याशी जशास तसं न वागता नम्र वागते. कारण त्यांना तुम्हाला कधीच दुखायचं नसतं. कारण ज्या व्यक्तीनं वेदनांचे चटते सहन  केले असतात, ती व्यक्ती दुसऱ्याला कधीच दुखवत नाही. वाईट वागत नाही. तुमच्यासाठी त्याने केलेले प्रयत्न या गोष्टी असं सिद्ध करतात की, ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात.जी व्यक्ती असह्य वेदना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी, सोबत राहण्यासाठी सहन करते. ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीही करू शकते ही गोष्ट तेवढीच खरी.

बरेचजण प्रेमात आत्महत्या का करतात. तर मला असं वाटतं की, खरंतर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जिवंत असताना किंवा नसताना कायमची सोडून जाते.  तेव्हा होणाऱ्या वेदना खरं तर असह्य असतात. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सांभाळू शकते असंही नाही. प्रत्येक व्यक्ती उत्तर शोधू शकत नाही. काही प्रश्नांची उत्तरं वेळेवर सापडतात. असंही नाही. बऱ्याच जणांना या वेदना सहन करण्यापेक्षा जीव गेलेला बरा असा विचार येतो. जसं अगरबत्ती वेदनांचे चटके सहन करत संपत असते. अगदीच तसंच.जेव्हा व्यक्तीला असं वाटतं तेव्हा खरंच त्या वेदना अत्यंत त्रास देणाऱ्या असतात. त्या वेदनेमुळे माणसाच्या मनावर, शरीरावर, हृदयावर, विचारांवर  इतका आघात होतो आणि सर्व गोष्टी माणसाला सहन होत नाहीत.... रात्री झोप न येणं, डोळ्यात अश्रू येणं, जेवण करायला मन न लागणं, छाती दुखणं, चिडचीड करणं, शरीर थरथर कापणं इत्यादी. शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात. त्यामधे वायब्रेशन होणं अशा सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेदना होतात. त्या वेदना तुम्हाला पुष्कळदा रडवून सोडतात. बऱ्याचदा तुम्हाला असंही वाटेल की तुम्ही त्या व्यक्तीजवळ मनसोक्त रडावं. परंतु ती व्यक्ती तुमच्या जवळ नसते. म्हणून पर्याय नसतो. बऱ्याच घटना तुम्हाला सहन करव्या लागतात तेव्हा कळतं वेदना काय असतात.


आयुष्यात इतकं निःस्वार्थीपणानं राहूनसुद्धा अशा व्यक्ती दुर्लक्षित का राहतात ? त्यांच्या वाटेला का एवढी दुःखं येतात ?  त्यांना समजून का घेतलं जातं? 

जेव्हा व्यक्तीला वेदनांचे चटते झोंबतात. तेव्हा त्रास किती असेल याची कल्पना करू शकत नाही. पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.असे म्हणतात की, रोता हुआ पुरुष' इस सृष्टि का सबसे 'दुर्लभ' दृश्य है। हे स्त्री ! तुम चूमना उसकी आँखें... और कहना... "तुम रो सकते हो...!"

ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो त्याच व्यक्तीमध्ये असह्य वेदना देण्याची ताकद असते. अन्यथा दुसरी व्यक्ती तुम्हाला असह्य वेदना देऊ शकत नाही. वेदना ह्या दिसत जरी नसल्या तरी जो सहन करतो त्याला विचारा. हेच की वेदना झाल्यानंतर किती त्रास होतो. झाल्यानंतरही जेव्हा आपल्या वेदना सांगतो तेव्हा ती व्यक्ती जेव्हा तुमच्या वेदनाची दखलसुद्धा घेत नाही. स्वतःमधे बदल आणत नाही. तेव्हा शांत होण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. म्हणून असं म्हणतात  Great Souls suffer in Silence. 

उर्वरित उद्याच्या अंकात..... ✍️



-सागर जाधव
वॉटर सप्लाय, मु पो ता.वणी
संपर्क :7038204209
चला वेदनांच्या ओठांवर 'स्माईल' आणूयात..! चला वेदनांच्या ओठांवर 'स्माईल' आणूयात..! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 15, 2024 Rating: 5
Powered by Blogger.