सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील पिसगांव येथे कबड्डीचे खूले सामन्याचे उदघाटन काल (ता.१४) ला मोठ्या थाटात पार पडले असून जाने. १४ ते १५ जानेवारी पर्यंत सामान्यांचा 'थरार' पाहता येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मंदा रवि मेश्राम (सरपंच), उद्घाटक मा. संजीव रेड्डी बोदकुरवार (आमदार वणी विधानसभा क्षेत्र), तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अविनाश लांबट (भाजपा तालुका अध्यक्ष), श्री.नवसु सुनीत (सा.कार्यकर्ता), श्री.सुरज बुटे, (उपसरंपच), श्री. सदाशिव मेश्राम (ग्रा.पं.सदस्य), सौ. मायाबाई रस्से,
श्री सुरेश चांगले (माजी सरंपच), श्री. अशोक चाफले (ग्रा. पं. सदस्य), सौ. सरिता नागोसे (ग्रा.प. सदस्य),
श्री.भूषण कोल्हे, श्री. देविदास मुसळे (प्रनिष्ठित नाग.), श्री राजू फरवाडे (पो.पा.) यांची उपस्थिती होती.
रविवारी झालेल्या उदघाटन प्रसंगी आमदार श्री. बोदकुरवार यांच्या उपस्थितीत जय जिजाऊ (पिसगांव) वर्सेस झाशीची राणी (पिसगांव) महिलांचा शो मॅच सामना खेळविण्यात आला. यात झाशीची राणी या संघाने विजय झाला.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाईल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय घोडमारे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर फुलभोगे तर आभार प्रदर्शन विशेष चौधरी यांनी केले.
पिसगांव येथे दोन दिवशीय कब्बड्डीचे खुले सामने
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 15, 2024
Rating: