सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मारेगाव तालुका अध्यक्षपदाची धुरा परत मारोती गौरकार यांच्या खांद्यावर देण्यात आली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या मारेगाव तालुक्यातील कार्याची दखल घेऊन त्यांना याबाबत नियुक्तपत्र देऊन पुन्हा एकदा काँग्रेस चे तालुकाध्यक्षपद बहाल केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला विजयी भव करण्याचे मोठे आव्हान तालुका अध्यक्ष श्री. गौरकार यांच्यासमोर आहे. राज्यातील चित्र पाहता पक्षाला ला अच्छे दीन जरी नसले तरी काँग्रेस चे विद्यमान तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या अच्छे दिनाचे किंबहुना कार्याचे कौतुक करावे तितकं कमीच आहे. त्यांच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर विविधांगी आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले तसेच कोरोना काळात श्री गौरकार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत लोकांना पक्षात सामावून घेण्याचं काम मात्र ते सतत करित आहे.
त्यामुळे मारोती गौरकार यांच्या उत्तम कार्याची दखल काँग्रेस नेत्यांनी घेऊन त्यांचेवर विश्वास टाकत त्यांची परत मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. या पुनःश्च निवडीने तालुक्यातील कष्टकरी, काँग्रेस वर असीम प्रेम करणारे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, ते या निवडीचे श्रेय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेस नेते वामनराव कासावर, जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, माजी महिला बाल कल्याण सभापती अरुणा खंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यासह इतरही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ते देत आहे.
मारेगाव काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी पुनःश्च निवड झाल्याबद्दल आमचे नेते मारोती भाऊ गौरकार यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मला १००% खात्री आहे की, भाऊंईंच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष संघटन आणखी मजबूत होईल, आगामी सर्व निवडणूकीत काँग्रेस दैदिप्यमान यश संपादित करेल. असा आशावाद युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष समीर सय्यद यांनी सह्याद्री चौफेर ला बोलताना व्यक्त केला.
मारोती गौरकार यांची पुनःश्च काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 15, 2024
Rating: