शिवनाळा येथील महिला धडकल्या मारेगाव पोलीस स्टेशन वर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात विविध अवैध व्यवसायाचा धुमाधाडका सुरु असून कोणाचे कोणावर नियंत्रण नसून यावर आळा घालण्यासाठी शिवनाळा येथील असंख्य महिला मारेगाव पोलीस ठाण्यावर धडकल्या आणि अवैध व्यवसाय आवरण्याची मागणी करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील शिवणाळा येथे दारूचा महापूर वाहतोय हे नविन नसले तरी यात युवक तरुण, शेतकरी व शेतमजूरात दारू पिण्याचे प्रमाण वाढले असून कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होवून गावातील सामाजिक स्वास्थ्यास बिघडत आहे.

या अवैध दारू विक्री व पुरवठा करणाऱ्या अवैध व्यवसायिकाचा तत्काळ शोध घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी शिवनाळा येथील महिलांनी पोलिसात केली आहे. यावेळी शशिकला आत्राम, सपना आत्राम, वंदना पिंपरे, शारदा आत्राम, कमला टेकाम, वनिता आत्राम, रामतुला मोरे, रंजना आत्राम, आरती मोरे, निर्मला लोनसावळे, राहुल आत्राम यांचेसह अनेकांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. 
शिवनाळा येथील महिला धडकल्या मारेगाव पोलीस स्टेशन वर शिवनाळा येथील महिला धडकल्या मारेगाव पोलीस स्टेशन वर Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2024 Rating: 5
Powered by Blogger.