सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : काल अचानक रात्री पेट्रोल पंप धारक संपावर जाणार असल्याच्या चर्चेने धास्तावलेल्या लोकांनी स्थानिक पेट्रोल पंपाकडे धाव घेत, चारचाकी की असो की मग दुचाकी असो, 'टॅंक फुल' होत पर्यंत पेट्रोल ओतून घेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात सर्व वाहन चालकांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत उमटले. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा आर्वजून ऐकायला मिळत होती. गाड्या, मोटर बंद राहणार, जायचे यायचं कसं. अशी एकच लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली असता रात्री च्या सुमारास वणी,मारेगाव तालुक्यात पेट्रोल पंप धारक संपा वर जाणार किंबहुना पेट्रोल बंद राहणार अशी चर्चा पसरताच धास्तावलेल्या शहरी ग्रामीण भागातील लोकांनी जवळ च्या पेट्रोल पंपाकडे धाव घेत आपल्या वाहणात आवश्यक पेट्रोल डिझेल ओतून घेतले. शिवाय काहींनी डिझेल पेट्रोल बॅकअप म्हणून कॅन, बोटलं मध्ये सुद्धा भरून ठेवल्याचे असे अनेकांनी सांगितले. सर्व पंप बंद राहणार या चर्चेने दरम्यान पेट्रोल पंपावर तोबा गर्दी पहायला मिळाली.
राज्यात कालपासून वाहन चालकांनी नवीन कायद्या विरुद्ध एल्गार पुकारल्यानंतर अनेक महामार्गांवर चक्का जाम आंदोलने सुरु केले त्यामुळे पेट्रोल पंप सुद्धा बंद राहणार म्हणून जो तो माणूस इंधन भरून घेत आहे, मात्र या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे. संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहन धारकांनी जपून वापर करावा, असे मत जानकारांनी व्यक्त केले. तूर्तास आज मारेगावात दुपारनंतर काही पंपावर इंधन "नाही" चे फलक लागल्याचे दिसून आले.
पेट्रोल पंप बंदची धास्ती, लोकांनी घेतलं गाडीत तेल ओतून अन स्टॉकही...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 02, 2024
Rating: