मटका अड्डयावर छापा,पोलिसांनी केली एकाला अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलिस अवैध मटका अड्डे चालविणार्‍यांवर करडी नजर ठेवत दिनांक ३० डिसेंबर २०२३ ला छुप्या पद्धतीने चालवित असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांनी कार्यवाही करीत मटक्याचे आकडे घेणार्‍याला अटक केली.

शहरातील एकता नगर परिसरात छुप्या पद्धतीने सट्टा मटका चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाण्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहू नये यासाठी पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे एक इसम मटका पट्टी फाडताना निदर्शनास आला. लोकांकडून पैसे घेऊन कागदावर मटक्याचे आकडे लिहून देणार्‍या दयाराम फते यादव (४७) रा. राजूर कॉलरी असे नाव असलेल्या या इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली.

दरम्यान, मटका चालक चालविणार्‍याचे नाव विचारले असता त्याने अभय उर्फ छोटू होले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांवरही मुजुकाच्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.


मटका अड्डयावर छापा,पोलिसांनी केली एकाला अटक मटका अड्डयावर छापा,पोलिसांनी केली एकाला अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.