सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. 1 जानेवारी 2024 पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून मारेगावसह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर आहेत.
या मागण्यासाठी रेशन दुकानदारांनी पुकारला संप
● रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा
● मार्जिन मनी 300 रुपये करा
● टू जी (2G) ऐवजी फोर जी (4G) मशीन द्या
● कालबाह्य नियम बदला
एकंदरीत, विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून राज्यातील सर्वच रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आज 1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांनी पुकारला बेमुदत संप...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 01, 2024
Rating: