सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, वाढलेला खेळ आहे. आज जगभरातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कबट्टी हा खेळ खेळला जातो. ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता टिकवून ठेवली असून ग्रामीण भागातच या मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. प्रो- कबड्डीने हा खेळ देशातील घरोघरी पोहोचवला. त्यामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आणि यात व्यावसायिकता आली. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनी या खेळाकडे आता करिअर म्हणून पाहायला पाहिजे. असे मनोगत रंगनाथ निधी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले, भालर येथील सिताई नगरी येथे कबड्डीच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले, अध्यक्षीय भाषणात ते बोलत
होते.
दीप प्रज्वलन करून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते महिला व पुरूष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, किरण देरकर, संजय देठे, सुनील वरारकर, जगन जुनगरी, वसंत जिनिंग अँड प्रेसिंगचे अध्यक्ष आशिप खुलसंगे, फैजल बशीर खान, विनोद दुमणे, अंकुश बोढे, हसेन बाशा, बाबाराव हेपट, मोईन खान, भगवान मोहिते, मनिष बतरा, विलास कालेकर, बनन वाटेकर यांच्यासह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटन पर सामना महिला गटातील खैरगाव विरुद्ध भालर यांच्यात झाला. खैरगाव येथोल महिला संघाने विजयी सलामी दिली. महिलांचे सामने दोन दिवस रंगले, सोमवारी रात्री टीएसओ वणी आणि भोपाळ यांच्यात अंतिम सामना रंगला. यात टीएसो वणी संघ बाजी मारत विजेता ठरला. तर भोपाळ संघ उपविजेता ठरला. तिस-या क्रमांकावर देवठाणा वाशिम, तर चौथ्या क्रमांकावर मुंबईचा संघ राहिला. या स्पर्धेत देशभरातील 16 महिलांचे संघ सहभागी झाले आहे. मंगळवार दिनांक 2 जानेवारीपासून पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धेला सुरुवात झाली. आणखी तीन दिवस
कबड्डीचा थरार रंगणार आहे.
तीन गटात ही स्पर्धा होत असून यातील पहिला गट हा खुला पुरुष गट आहे. दूसरा गट 60 किलो पुरुष गट तर तिसरा गट हा महिलांचा आहे. खुल्या गटात पहिले बक्षिस है 40 हजार, दुसरे बक्षिस 30 हजार, तिसरे बक्षिस 20 हजार तर चौथे बक्षिस 10 हजार रुपये आहे. 60 किलो पुरुष गटासाठी अनुक्रमे 30 हजार, 20 हजार, 15 हजार व 10 हजार तर महिला गटासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10 हजार व 7 हजारांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे. जय गुरुदेव सेवा मंडळ भालर यांच्या वतीने, बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर यांच्या सहकार्यातून व स्व. हेमंत खंगार यांच्या स्मृती प्रित्यर्थ या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व भालर ग्रामवासी परिश्रम घेत आहे.
कबड्डीची लोकप्रियता ग्रामीण भागामुळे टिकून - संजय खाडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 04, 2024
Rating: