वणी येथे T-10 चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्दघाटन


सह्याद्री चौफेर | दिगांबर चांदेकर 

वणी : पारसमल प्रेमराज ज्वेलर्स वणी प्रस्तुत T-10 चॅम्पियन लीग 2024 टेनिस बाॅलचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यवतमाळ जिल्ह्यातील क्रिडा विश्र्वाच्या इतिहासात सर्वात स्पर्धेचे उदघाटन नुकतेच वणी येथील शासकिय मैदान (पाण्याच्या टाकीजवळ) येथे करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्दघाटन भाजपाचे प्रदेश सदस्य विजय चोरडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, T-10 लीग चे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड.कुणाल विजय चोरडिया, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या प्रमूख व मान्यवरांच्या उपस्थितीत सौ.ख्याती कुणाल चोरडिया यांच्या हस्ते फीत कापून पार पडले.

यावेळी टी-10 चॅम्पीयन लीगचे पदाधिकारी व सदस्य,टीम मालक आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी वणी,मारेगाव,झरी तालूक्यातील नामवंत खेळाडूचा सहभाग असल्यामूळे अतिशय उत्कृष्ठ असे क्रिकेट लीग चे आयोजन केल्याबद्दल परिसरातील सर्व क्रिकेटप्रेमींनी आयोजक समितीचे कौतुक केले आहे. या स्पर्धेला वणी, मारेगाव व झरी तालूक्यातील क्रिडाप्रेमी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
वणी येथे T-10 चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्दघाटन वणी येथे T-10 चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्दघाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.