मायेच्या छायेखाली : कवी उदय रायपुरे

मायेच्या छायेखाली:

मायेची ममता मुलापरी काय असते
कितीही दुःख झाले तरी ती लपवीत असते..
आपल्या कुशीत ती संभाळीत असते
वेदना कितीही झाल्या तरी ती सोसित असते..
सांगुणी कुणाला दुःख, वाटले जातं नसते
म्हणुनी जीव बाळासाठी ती दुखवीत असते..
जिणे आयुष्य त्याच्यासाठी झिझविले असते
काहीही होऊ दे जीवाला तरी तिचं प्रेम साबूत असते..
काबाळ कष्ट करुनी घास ती घालीत असते
स्वतः उपाशी राहून मुलास ती घालीत असते..
जिव्हाळा मायेचा अंतःकरणातुनी असते
त्याला काहीही झाले मायेच्च्या डोळ्यात आसू असते...
लेकरापरी व्याकुळ मनाने सर्व काही सहन करते
तीचा त्याचे वरती नेहमी प्रेमाचा हात असते..
मायेच्या ममतेचे जाण ठेवणारे काही असते
थकल्या काळामध्ये तिरस्कार करणारेही दिसते..
अशीच आठवण झाली ती रस्त्याच्या कडेला दिसते
क्षणाक्षणाला माझ्या आईचं प्रेम मला नजरेत भरते..
ध्यानात ठेव उद्या मायेची ममता काय असते
म्हणुनी लेकरू कसं का असेना त्याचे साठी तीचा जीव दुखते..
मायेची ममता मुलां परी काय असते...

©® कवी :- उदय रायपुरे
मु पो त मारेगाव जि.यवतमाळ
मो.7020615358
मायेच्या छायेखाली : कवी उदय रायपुरे मायेच्या छायेखाली : कवी उदय रायपुरे Reviewed by सह्याद्री चौफेर on January 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.