कोसारा परिसरात 'फीर कोळसाची हेराफेरी'


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खैरी ते वरोरा मार्गांवरील असलेल्या कोसारा परिसरातील वर्धा नदी च्या अलीकडे फिरसे कोळसाची हेराफेरी सुरु झाली आहे. यात काही जिल्ह्याबाहेरील लोकांची भागीदारी असल्याचे बोलल्या जात असून काही प्रशासनातील चरण चुंबक हात ओले करित असल्याचे चर्चा जोमात आहे.
मारेगाव तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खैरी वरून वरोरा कडे जाणाऱ्या कोसारा मार्गांवर कोलडेपो, अगदी वर्धा नदीच्या काठावर असून मोठ्या प्रमाणात कोळसाची खुलेआम तस्करी केली जात आहे. या दोन्ही कोल डेपोत एकोणा, वणी क्षेत्रातील चाळीस ते पन्नास ट्रक कोळशाची भरीव चोरी करून खुल्या बाजारात विक्रीकरिता आणले जातात. किंबहुना येथून एक्स्ट्रा कोळशाची हेराफेरी केली जाते.

विशेष उल्लेखनीय की, माऊलीकर हा प्रशासनाला खिशात ठेऊन मागील वर्षापासून या कोसारा परिसरात तो गोरखधंदा चालवत असताना ह्या ट्रक चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता सगळे मुंग गिळून गप्प आहे.

सूत्राच्या माहिती प्रमाणे खदान मधून लोड करून आलेले ट्रक येथे रोज खाली करून उर्वरित माल ओला करून ट्रक रवाना केला जातो. याबाबत वरिष्ठाना सुद्धा माहिती देवून कारवाई करण्यात येत नाही, याचा अर्थ तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत सगळ्यांचे हात ओले होत आहे, अशी शंका वर्तविली जात आहे. कोणाच्या पाठबळाने गोरखधंदे सुरु आहे, हे जनमानसात चर्चील्या जात असून,'हम सब चोर है' असंही नागरिकांतून बोलल्या जातं आहे. परिणामी कोसारा परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल डेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
कोसारा परिसरात 'फीर कोळसाची हेराफेरी' कोसारा परिसरात 'फीर कोळसाची हेराफेरी' Reviewed by सह्याद्री चौफेर on January 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.