उद्या मारेगावकर घेणार "वळण"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : उद्या 27 जानेवारी ते 2 फेब्रु. दरम्यान परसोडा येथे भव्य शिवपुराण कथा होत आहे. त्या अनुषंगाने सात दिवसाच्या प्रवचनाला मोठ्या संख्येने भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून उद्या मारेगाव ते वणी हा महामार्ग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी, गृहविभागाने काढला आहे.
त्यामुळे उद्यापासून सात दिवस मारेगावकर मार्डी, नांदेपेरा, वणी असे वळण घेणार आहे. परंतु वणी-यवतमाळ मार्गांवरील असलेले राजूर, निंबाळा, भांदेवाडा, बोदाड, झरपट, सोमनाळा व कळमना ह्या गावांना त्रास होणार आहे ह्या करीता संबंधित गावांचा रहिवासियांकडून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहेत. तर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वणीला आलेले एडी. एस पी जगताप साहेब ह्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, जगताप साहेबांनी सर्वतोपरी पोलीस विभाग सहकार्य करेल मार्ग संबंधित बाधित गावांना मोकळा करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
मात्र, वणी ते मारेगाव हा महामार्ग बंद करण्यात येणार असल्यामुळे कोणत्याही वाहनांची येरजाऱ्या होणार नसल्याने शेतकरी, शेतमजूर, रोज मजुरी करणारे, ऑटो वाहक, शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, चुना उत्पादन, चुना उद्योगातील शेकडो कामगार रोजमजुर, गावात किराणा व अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होईल व येथील किराणा व अन्य व्यवसाय बंद राहतील व त्यामुळे चालत्या फिरत्या उद्योग,धंद्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे. 
तसेच मारेगाव येथून वळण घेतल्यावर मार्डी, नांदेपेरा, वणी या मार्गाचा अधिक चा ताण वाढणार आहे. आधीच जड वाहतुकीस बंद असलेला हा रस्ता. आता भरधाव वाहने धावताना दिसणार किंबहुना अपघाताची शक्यता बळावणार, या पूर्वी नांदेपेरा मार्गाने कोळसाची जड वाहतूक करणारी ट्रक वाढली होती, तेव्हा या मार्गांवर नाहक जीव लोकांना गमवावा लागला. आताही तीच परिस्थिती मार्डी नांदेपेरा वणी या वळणावर उद्भवल्यास पुन्हा अपघाताची शृंखला चालणार तर नाही,असे भीतीदायक बोलल्या जात आहे. 
वरील ह्या महत्त्वाचा मुद्दा व प्रश्न संबंधित विभागाने लक्षात घेऊन हा वणी यवतमाळ महामार्ग पूर्ववत सुरु ठेवावा अशी सर्व सामान्यांना वाटत आहे किंबहुना बंद करू नये अशी अपेक्षा असून एडी एस पी जगताप साहेबांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जनतेला दिलेले आश्वासन कितपत प्रत्यक्षात दिसते याकडे मारेगाव वणी महामार्गांवरील दैनंदिन वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे लागले आहे.


उद्या मारेगावकर घेणार "वळण" उद्या मारेगावकर घेणार "वळण" Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.