प्रजासत्ताक दिन विशेष; जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास....!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आज आपण स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास
भारत स्वतंत्र झाल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आली. याच दिवशी भारत प्रजासत्ताक असल्याची घोषणा करण्यात आली. १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यामुळे याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले.
सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एका बैठकीचे आयोजन केले होते. यात ब्रिटिशांनी २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी करण्यात आला. या दिवशी सर्वात पहिलं भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिति तयार करण्यात आली. यात ३०८ सदस्य होते. हा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब यांनी तयार केला. यात अनेक सुधारणा आणि बदल केल्यावर समितीच्या सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी ही घटना सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. यानंतर १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 
या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दिवशी, तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे आणि भव्य लष्करी संचलन देखील केले जाते.

प्रजासत्ताक दिन विशेष; जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास....! प्रजासत्ताक दिन विशेष; जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास....! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.