टॉप बातम्या

शेकडो युवक व ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 8 जानेवारी 2024 रोजी मारेगाव तालुक्यातील आवळगाव व खेकडवाई येथील शेकडो युवक व ग्रामस्थांनी संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार व पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यामध्ये विशेषतः महिलांचा अधिक प्रमाणात समावेश होता. गोरगरिबांचे कैवारी व त्यांच्या मुलभूत अडीअडचणीची जाणीव असणारे मनसेचे नेते राजूभाऊ उंबरकर अशी ग्रामीण भागात उंबरकरांची ओळख आहे. तूर्तास विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये इन्कमिंग मोठ्या झपाट्याने होताना दिसत आहे.
          
यावेळी मनसेचे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, मारेगाव शहर अध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष सुरज नागोसे, विभाग अध्यक्ष कुणाल शेडामे, व पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post