सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : नवीन कायदा आणि भरमसाठ दंडामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकात तथा सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारचा 'हिट अँड रण' हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत पुन्हा राज्यातील अनेक भागात वाहन चालकांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद मारेगावातही उद्या उमटणार आहे. मध्यनंतरी आंदोलन मागे घेण्यात आले होते, परंतु सरकारचा कायदा रद्द करण्यात आला नसल्यामुळे पुन्हा राज्यात आंदोलनाला सुरवात झालेली असून उद्या गुरुवार (११ जाने.) ला यवतमाळ-वणी महामार्गावरील करणवाडी फाट्या वर सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरी ग्रामीण भागातील सर्व वाहन चालक संघटित होऊन वाहन चालकांच्या मानगुटीवर बसणारा वटहुकूम,काळा कायदा रद्द करण्यासाठी आज तहसीलदार यांचे मार्फत देशाचे प्रधानमंत्री (भारत सरकार) यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकार च्या विरोधात व हिट अँड रण हा कायदा रद्द करण्याकरिता लाल बावटा वाहन चालक युनियन शाखा नरसाळा, ऑटो युनियन मारेगाव, जगन्नाथ वाहन चालक युनियन मारेगाव च्या वतीने करणवाडी फाट्यावर सकाळी ११ वाजता वाहन चालक विरोधी काळा कायदा रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, असे लाल बावटा वाहन चालक युनियन चे शब्बीर खां शेख खां पठाण यांनी यावेळी सांगितले. उद्या होणाऱ्या आंदोलनास मारेगाव तालुक्यातील सर्व वाहन चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व सदस्यांनी केले.
उद्या वाहन चालकांचा रास्ता रोको
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 10, 2024
Rating: