पोलीस स्टेशन मधिल एकूण ०६ गुन्हयात एक वर्षापासुन फरार असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना शिताफीतीने केली अटक
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : दिनांक १२/०९/२०२३ रोजी फिर्यादी सुभाष धोंडुजी येवले वय ५७ वर्ष रा. भालर वसाहत ता. वणी जि. यवतमाळ यांचे फिर्यादवरून पो.स्टे. वणी येथे अप.क.९८९/२०२३ कलम ३९७,३९४,३२४,३४ भा.दं. वि. अन्वये गुन्हा दाखल होवुन तपासावर होता. गुन्हयातील ईतर आरोपीस अटक करण्यात आली होती.
ईसम नामे अनिल विनायक येमुलवार वय २२ वर्ष रा. खरबडा मोहल्ला वणी हा गुन्हा केल्याचे दिनांकापासुन फरार झाला होता. तो वारंवार त्याची अटक चुकवुन पोलीसांना गुंगारा देत होता. तो ग्राम पिंपळखुटा ता.आर्वी जि. वर्धा येथे असल्याची खात्रीशिर गोपनिय माहीती पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी त्याचा शोध घेवुन आणणे करीता स.पो.नि. माधव शिंदे यांचे नेतृत्वात डी.बी. पोलीस पथक रवाना केले. नमुद पोलीस पथकाने त्यास ग्राम पिंपळखुटा पोलीस स्टेशन खरांगणा ता. आर्वी जि. वर्धा येथे जावुन शिताफिने ताब्यात घेवुन विचारपुस करण्यात आली असता त्याचे सोबत असलेला ईसम नामे दिनेश रविंद्र मेश्राम वय २० वर्ष रा. खरबडा मोहल्ला वणी हा मिळुन आला.
दोन्ही आरोपी हे १) पोलीस स्टेशन वडगांव (जंगल) अप.क. १७५/२०२३, १४१/२०२३ कलम ३७९भा.दं.वि, २) पोलीस स्टेशन शिरपुर अप.क. ३४५/२०२३ कलम ३७९ भा.दं. वि., ३) पोलीस स्टेशन मारेगांव अप.क.३९३/२०२३ कलम ३७९भा.दं.वि, ४) पोलीस स्टेशन राळेगांव अप.क. ०१/२३ कलम ३७९ भा.दं.वि. मधिल गुन्हयात फरार असल्याबाबत माहीती प्राप्त झाली वरून दोघानांही पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वणी येथे आणून दिनांक ०९/०१/२०२४ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली. व गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बंन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे उप.वि.पो.अधि.वणी, पोलीस निरिक्षक अजित जाधव ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, स. फौ.सुदर्शन वानोळे, पो.ना. पंकज उंबरकर, पोको. विशाल गेडाम, पोको. वसीम शेख यांनी केली.
पोलीस स्टेशन मधिल एकूण ०६ गुन्हयात एक वर्षापासुन फरार असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना शिताफीतीने केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 10, 2024
Rating: