धनादेश अनादर प्रकरणी 'जुमळे'ना एक वर्षाचा कारावास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : धनादेश अनादरप्रकरणी एका आरोपीला मारेगाव न्यायालयाने एका वर्षाचा कारावास व २० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
श्रीकांत निळकंठ जुमळे रा. डोंगरगाव (ता. मारेगाव) असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे. श्रीकांत यांनी श्री. रंगनाथ स्वामी नागरी सह. पत संस्था मर्या. वणी शाखा मारेगाव येथून कर्जाची उचल केली होती. मात्र, कर्जाची रक्कम न देता संस्थेला धनादेश दिला होता. परंतु त्याच्या खात्यात रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादर झाला. त्यामुळे संस्था कर्मचारी आनंद गंगशेट्टीवार यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
येथील न्यायदंडाअधिकारी निलेश पी. वासाडे यांनी युक्तिवाद ऐकूण आरोपी श्रीकांत निळकंठ जुमळे यास धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा व वीस लाख रुपये नुकसान भरपाई रक्क्म पतसंस्थेला अदा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. अमोल गौरकार यांनी न्यायालयात बाजू मांडली.
धनादेश अनादर प्रकरणी 'जुमळे'ना एक वर्षाचा कारावास धनादेश अनादर प्रकरणी 'जुमळे'ना एक वर्षाचा कारावास Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2024 Rating: 5
Powered by Blogger.