सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यात वर्धा नदीच्या अलीकडे, कोसारा-खैरी मार्गांवर अवैध कोळशाचा चोर बाजार राजरोसपणे सुरु असून निडरपणे तस्कराकडून हा व्यवसाय जोमात आहे. हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही की 'कोयले के दलाली में इनके भी हात काले' तो नही ना अशी अर्थपूर्ण शंका निर्माण होणे सहाजिक आहे. ह्या संदर्भात नानाविध ई-पेपर आणि माध्यमातून बातम्या प्रकाशित होऊनही पोलीस प्रशासनाला जाग का? येत नाही हा संशोधनाचा विषय आहे. शासकीय मालमत्तेची अशी खुलेआम तस्करी करून शासनाच्या महसूलला चुना लावून काही मातब्बर स्वतःचा गल्ला भरत असल्याची चर्चा परिसरात रंगतांना दिसत आहे.
मारेगाव तालुक्याच्या शेवट च्या टोकावरील कोसारा ते माढेळी मार्ग तसा अवैध तस्करीसाठी कुपरिचित आहेच. वर्धा नदी काठाजवळच वरोरा मार्गे येणाऱ्या कोलवाहू ट्रकमधून कोळसा चोरून किंवा कमी दरात विकत घेऊन काही मूठभर मंडळी गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करत आहे. सोबतच परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे व सामान्य जनतेला श्वसन संस्थेशी संबंधित आजाराच्या खाईत ढकलत आहे. एवढी हिंम्मत करतांना नक्कीच प्रशासनाचं पाठबळ आहे, अन्यथा ही हिम्मत सहजसोपी नाही. ह्या समस्येच्या मुळापर्यंत जावून कारवाई होईल का? की मुळापर्यंत जाण्याची इच्छाच नाही, यावर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश येईल का? ह्या आशेने सामान्याच्या नजरा खिळलेल्या आहे.
कोल बाजार, खैरी मार्गाने जाताना कोसारा गावाच्या अगदी वर्धा नदीच्या अलीकडेच काही अंतरावर हा चोर बाजार असून मोठया प्रमाणात खुलेआम तस्करी केली जात आहे. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोर बाजारात वणी, एकोणा क्षेत्रातील ट्रक कोळशाची चोरी करून खुल्या बाजारात विक्री करिता आणले जातात. किंबहुना येथून चोरीच्या कोळशाची हेरफेर केली जाते. ह्या अवैध वाहन चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल चोर बाजारावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
मारेगाव: पुन्हा कोळशाचा खुलेआम चोर बाजार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 31, 2023
Rating: