सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : राष्ट्रसंताचे नुसते भजन गाऊन चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणावे लागणार आहे. राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही, असे मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा ग्राम. सदस्य विजय अवताडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण सोहळ्यात कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव बेंडाळे, उदघाटक विजयाताई देहकर, प्रमुख पाहुणे श्री गंगाधर लोणसावळे महाराज, श्री विलासराव गोडे (सेवा अधिकारी केळापूर), श्री. प्रभाकर ठाकरे, श्री. झिबल भोयर, श्री.राजू सिडाम (ता. प्र. प्र.), श्री.सुभाष सप्रे (म. प्र.), श्री.कैलास बोन्डे, श्री.मनोहर वांढरे, श्री.देहाराज अडबाले, कुमार अमोल कुमरे (पत्रकार), श्री.मारोती उरकुडे (माजी सेवा अधिकारी), श्री. सुधाकर धानोरकर (म.प्र.), उमेश चव्हाण (गु. से. भ. मं वसंतनगर अध्यक्ष), आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.अवताडे म्हणाले की, संतांनी कधी जातपात मानला नाही, अखिल भारतीय मानव कल्याण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अवतरले. "याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा" आपल्याला ह्याच नरजन्मात सगळं भोगायचं आहे. आपण या 55 वा पुण्य सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमलो आणि संताच्या विशाल विचारांचा प्रचार व प्रसार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्या हातून घडत आहे,वसंत नगरवासी भाग्यवान आहेत आणि हेच वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव बेंडाळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यसनमुक्ती, स्पर्धा परीक्षा, आधुनिक साधन (मोबाईल), इव्हीएम मशीन (EVM), हुंडा प्रथा, शेतकऱ्यांची पिळवणूक, अशा अनेक सामाजिक विषयावर भाष्य केले. तसेच विचार पिठावर असलेल्या इतर मान्यवरांनीही आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व उत्तम आरोग्यासाठी राष्ट्रसंताकडे प्रार्थना केली.
वसंत नगर येथील शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन दि.29 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5. वाजता घटस्थापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6. वाजता श्री. सुधाकर धानोरकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायंकाळी 8. वाजता हपभ डॉ. गजानन महाराज सुरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवार दि.30 डिसेंबर 2023 ला पहाटे 5. वाजता ध्यान प्रार्थना, सकाळी 6. वाजता ग्रामसफाई, हपभ ज्ञानेश्वर ढप्पर महाराज यांचे सकाळी 9.वाजता काल्याचे किर्तन, त्यानंतर भव्य दिंडी मिरवणूक, कार्यकर्ता संमेलन, लगेचच महाप्रसाद चा कार्यक्रम, रात्री भजन संमेलन संपल्यानंतर राष्ट्र वंदनेने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आत्राम यांनी केले. तर उमेश चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, महिला मंडळ तथा समस्त वसंत नगर ग्रामवासी यांनी केले असून या पुण्यस्मरण सोहळ्याला जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातील आमंत्रित सर्व उपासक, उपासिका तथा सर्व गुरुदेव प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
संताच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही - विजय अवताडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 31, 2023
Rating: