सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
भालर येथे जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिरात 360 रुग्णांनी नेत्र तपासणी केली. तर मुकुटबन येथे राजेश्वर शिव मंदिर येथे घेण्यात आलेल्या शिबिरात 387 रुग्णांनी नेत्र तपासणी केली. नेत्र रुग्णांना 5 डिसेंबरला मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. तर मोती बिंदू असलेल्या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम (वर्धा) येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.
समाज सेवा हिच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं. श्री.चोरडिया यांनी स्वतः रुग्णांना आधार देऊन बसमध्ये बसविले, व सेवाग्रामला रवाना केले. या दोनही शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याचे मला समाधान मिळाल्याचं विजय चोरडिया मतही व्यक्त केलं. स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन वणी व कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोनही शिबिरांमध्ये नेत्र तपासणी केलेल्या 32 व 38 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना कस्तुरबा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 21, 2023
Rating: