सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : ग्रामपंचायत संगणक परिचालकाचे वेतन 20 हजार पर्यंत देण्यात यावे, मानधन निश्चित तारखेस देण्यात यावे, नियम बाह्य कामे लावताना ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा, टार्गेट सिस्टीम बंद करावी, प्रलंबीत मानधन तात्काळ देण्यात यावे अशा विविध मागण्याकरिता ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी काम बंद (ता.20) ला आंदोलन पंचायत समिती वणी समोर केले.
तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक अल्पशा मानधनावर कित्येक वर्षांपासून कार्य करीत आहे. विहित कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर पंचायत समिती, जिल्हापरिषद कार्यालयासमोर व आमदाराच्या निवास्थानाबाहेर संविधानिक पद्धतीने धरणे आंदोलन करून येणाऱ्या काळातील हिवाळी अधिवेशनावर मागण्या पूर्ण होईपर्यंत मोर्चा व आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 20, 2023
Rating: