राळेगाव पोलीस स्टेशन व यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : राळेगाव पोलिस स्टेशनचे हद्दित गोपालपूर येथील शेतकऱ्यांनी शेतात तुरीचे वरित गांज्याची झाडे लावली असल्याची माहिती, गुन्हे शाखा यवतमाळ यांना मिळाली असता पथकाने शेतात जाऊन पाहणी केली दरम्यान,त्याठिकाणी 60 गांज्याची झाडे आढळली. 
पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या संकल्पनेतून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात 'नशामुक्त पहाट' हे अभियान राबवून जिल्ह्यातील तरूणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ वाहतूक, विक्री, सेवन होणार नाही याकरीता स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने 4 नोव्हेंबर रोजी राळेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती आधारे  गोपालनगर येथील शंकर गणपत काळे यांच्या शेतात तुरीच्या वरित गांज्याची 60 झाडे आढळून आली.
दरम्यान,आढळून आलेल्या मालाचे वजन 16 किलो 840 ग्राम ज्याची अंदाजे किंमत 84,000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शंकर गणपत काळे रा.गोपालनगर  यांचे विरुद्ध पोस्ट राळेगाव येथे NDPS कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई आधासिंग सोनोने, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, रामकृष्ण जाधव पोलिस निरीक्षक, राळेगाव, सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, विवेक देशमुख, जमादार सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतीश फुके, विवेक पेठे, यासह स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोलिस स्टेशन राळेगाव येथील पोलिस अंमलदार गणेश हुलके, रूपेश जाधव, सुरज गावंडे, यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.