आता "4,000" डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना घरी बसण्याची आली वेळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत 104 ऑपरेटर्सवरही आता घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती केली. त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. त्यानंतर पुणे येथील मे. यशस्वी अकादमी फॉर स्लिल या कंपनीतर्फे एका संस्थेतर्गत 25 सप्टेंबर 2019 रोजी ऑपरेटर यांचा करारनामा करण्यात आला. तीन वर्षांचा करारनामा असताना आणि काम सुरळीतरित्या सुरू असताना आता कंपनीने ऑपरेटरला कामावरून कमी करण्याचे पत्र ई-मेल द्वारे पाठवण्यात आले. त्यामुळे ऑपरेटरमध्ये असंतोष असून त्यांनी 31 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
कोविड काळात जिवाची परवा न करता, आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी काम केले. आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना कसल्याही प्रकारचा सरकारी आधार नसताना देखील जीव तोडून काम केले. कोविड लसीकरणाच्या सगळ्या ऑनलाईन नोंदणी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी केली आहे. त्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षण देखील देण्यात आले. NCD, IDSP, FPLMS, DHIS2, HMIS, NAVTM, जन्म/मृत्यू, इतर सर्व नोंदणी कामकाज डाटा एन्ट्री ऑपरेटरकडून करण्यात आले. त्यानंतर शिकावू म्हणून पुण्याच्या संस्थेकडून डाटा एन्ट्री ऑपरेटरला कामावर घेण्यात आले. त्याकरिता करारनामा देखील करण्यात आला.
सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती तीन वर्षासाठी होती कामाची कसलीही तक्रार नव्हती. अधिकाऱ्यांचा अभिप्राय देखील चांगला आहे. मात्र, लहान-सहान कारणे समोर करून कंपनी डाटा एन्ट्री ऑपरेटरला त्रास देण्याचे काम करत आहे. प्रशिक्षित ऑपरेटरला आता कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यात सुमारे 4 हजारच्या संख्येत असलेल्या ऑपरेटरच्या कुटुंबासमोर पालन पोषणाचा विषय उभा ठाकला आहे. त्यामुळे आम्हाला कायम करण्यात यावे, या मागणीला घेवून कर्मचाऱ्यांनी 31 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून डाटा एन्ट्री ऑपरेटरदेखील संपावर गेल्याने आरोग्य विभागाचा कामकाज ठप्प पडला आहे.
आता "4,000" डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना घरी बसण्याची आली वेळ आता "4,000" डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना घरी बसण्याची आली वेळ Reviewed by सह्याद्री चौफेर on November 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.