मॅरेथॉन स्पर्धेत क्रिश मिस्त्री व निलिमा निकोडे यांनी पटकाविले पहिले बक्षीस

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : युवा सेना (ऊबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थावर) भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे अजिंक्य शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा वाजागाजा व फिजुलचा खर्च न करता युवकांसाठी उपयुक्त असा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.

या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुला - मुलींचे दोन गट पाडण्यात आले होते. यावेळी मुलांच्या गटातून क्रिश सतिंदर मिस्त्री याने पहिलं बक्षीस पटकावले आहे तर दुसरे ओम कैलास ढवळे तर तिसरे बक्षीस आकाश श्रावण ठमके यांनी पटकाविले तर मुलींच्या गटातून पहिलं बक्षीस निलिमा विठ्ठल निकोडे, दुसरे कोमल गणपत गौरकार तर तिसरे बक्षीस दिपाली गजानन पावडे या मुलींनी पटकाविले आहे. तर उर्वरित स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली.

या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा सेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे हे होते तर उद्घाटक म्हणून शिवसेना नेते संजय देरकर तर राजु तुराणकर, राजु वाघमारे, समिर लेनगुळे, दिलीप मालेकर, संजय देठे, संतोष बेलेकर, वैभव ठाकरे, अफरोज सर, प्रविण खानझोडे, महेश पहापळे, सोपान लाड, गणेश आसुटकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल बोर्डे, चेतन उलमाले, ऋषिकेश काकडे,अनुभव गावंडे, मिलिंद बावने यांनी परिश्रम घेतले.
मॅरेथॉन स्पर्धेत क्रिश मिस्त्री व निलिमा निकोडे यांनी पटकाविले पहिले बक्षीस मॅरेथॉन स्पर्धेत क्रिश मिस्त्री व निलिमा निकोडे यांनी पटकाविले पहिले बक्षीस Reviewed by सह्याद्री चौफेर on November 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.