सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करण्याचं घाट सरकारने घातला असून हा घाट उधळून लावण्यासाठी सर्वत्र आंदोलन, मोर्चा होत आहे. याच अनुषंगाने या ओबीसी महामोर्चा मध्ये समस्त जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी आरक्षण परिषद यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षण परिषदच्या प्रमुख मागण्या
१) जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
२) मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करू नये.
३) सरकारी नौकरीतील कंत्राटी तत्वावर पदभरती बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
४) सरकारी, शाळा-कॉलेज-दवाखाने-इतर संस्थाचे खाजगीकरण बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
५) ओबीसींना प्रत्येक तालुक्यात वसतीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे.
६) व्यवसायिक व इतर शिक्षणामध्ये १००% स्कॉलरशिप लागू करण्यात यावी.
७) ओबीसी जनगणनेनुसार शेतकरी, शेत मजुरांच्या विकासाकरीता बजेटमध्ये अनुदानाची आर्थीक तरतुद करण्यात यावी.
८) सरकारी निमसरकाऱ्यांमध्ये बहुजन समाजाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे जुनी पॅन्शन योजना २००५ पासून बंद केली ती तात्काळ सुरू करण्यात यावी.
९) ओबीसींचा सरकारी नौकऱ्यातील अनुशेष (बॅकलॉक) जाहीर करून तात्काळ पदभरती करण्यात यावी.
१०) ओबीसींची क्रीमीलेअरची घटना विरोधी अट रद्द करण्यात यावी.
११) OBC कर्मचाऱ्यांना SC/ST प्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे.
१२) सारथी/बार्टीच्या धरतीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेस निधी उपलब्ध करूण देण्यात यावा.
१३) विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक शहरात व तालुक्यात स्वतंत्र वाचनालय तथा अभ्यासिका तयार करण्यात यावी.
१४) शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा.
१५) ओबीसी शेतकऱ्यांना एससी/एसटी प्रमाणे शेतीपुरक लागणारे साहित्य देण्यात यावे.
वरील मागण्या मंजूर करण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले. संपुर्ण जिल्ह्यातील समस्त ओबीसी बांधवांनी या महामोर्चा मध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे असे, आवाहन प्रदिप भाऊ वादाफळे अध्यक्ष ओबिसी आरक्षण परिषद, अॅड. राजेंद्र महाडोळे, सतीश भोयर, शैलेश श गुल्हाणे, नरेंद्र गद्रे, प्रा. प्रकाश फेंडर, रमेश ठाकरे, साहेबराव जुनघरे, प्रकाश जानकर, अशोकराव तिखे, डॉ. विजय फावलकर, डॉ. देवेन्द्र मुलुंडे, डॉ. सागर झोपाटे, अॅड. अरुण मेहत्रे, जितेंद्र ब्राम्हणकर, प्रा. ईकवाल भुरा, अरूण नक्षणे, किशोर साखरकर, साहेबराव राठोड, डॉ. दिलीप धावडे, सौ. अंजलीताई फेंडर, सौ. अॅड. सिमाताई तेलंगे (लोखंडे), श्रीमती सविताताई हजारे, सौ. योगिताताई पंडीत, सौ. अवंतीताई सातपुते, यांच्या सह ओबीसी आरक्षण परिषद च्या वतीने करण्यात आले आहे.
चलो यवतमाळ : उद्या जिल्हास्तरीय ओबीसींचा महामोर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 25, 2023
Rating: