सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील आदिवासी सोशल फोरमच्या वतीने स्थानिक वसंत जिनिंग सभागृहात आदिवासी पर्व मोठ्या उत्साहात पार पडला.
या पर्वाचे उद्घाटन आदिवासी प्रशिक्षण व संशोधन परिषद पुणेचे माजी आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी केले. अध्यक्षस्थानी साहित्यिक उत्तम गेडाम होते. यावेळी पुष्पा आत्राम, लेतू जुनगरे, पैकू आत्राम यांची भाषणे झाली. प्रास्ताविक रामदास गेडाम यांनी केले. संचालन श्रीकृष्ण मडावी व बेबी मेश्राम यांनी केले.
यावेळी अविष्कार चांदेकर, अगस्त कुळसंगे, संस्कृती केळकर, योगेश्वरी डोणेकर, सुवर्णा उईके यांचा सत्कार करण्यात आला. आभार बी. डी. आत्राम यांनी मानले. दोन दिवसीय चर्चा सत्रातील पाहुण्यांचे स्वागत रमेश मडावी यांनी केले. चर्चासत्रात गीत घोष, अॅड. प्रमोद घोडाम, अॅड. राजेंद्र मरस्कोल्हे, डॉ. संगीता भल्लावी, सेवानिवृत्त एसीपी साखरकर या विचारवंतांनी भारतीय संविधान व आदिवासी समूह, स्वातंत्र्योत्तर स्वसमाज परिवर्तनासाठी आंदोलने व आदिवासी स्त्रियांच्या समस्या या विषयावर विचार व्यक्त केले.
संचालन वसंत चांदेकर, छाया उईके, माया मरस्कोल्हे यांनी केले. तर आभार मेघा राजगडकर यांनी मानले. यशस्वितेसाठी अशोक राजगडकर, संतोष चांदेकर, माया मरस्कोल्हे, रजनी पोयाम, अशोक नागभिडकर, आशा कोवे, सुभाष चांदेकर, संगीता तोडसाम, अजय राजगडकर, प्रशांत डोनेकर, महेश आत्राम, अरविंद तिराणकर, कैलास मेश्राम, दीनानाथ आत्राम, भगवान आत्राम, रमेश गेडाम यांनी परिश्रम घेतले.
वणी शहरात दोन दिवसीय आदिवासी पर्व उत्साहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 25, 2023
Rating: