मागील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला दिला काँग्रेसने न्याय..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वसंत जिनिंग संचालक मंडळाच्या बैठकीत काल एकमुखी निर्णय घेण्यात आल्यानंतर यवतमाळ जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून वसंत जिनिंग पदी अंकुश रुपाजी माफूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काँग्रेसच्या पराभूत झालेल्या उमेदवाराला काँग्रेसने न्याय देत वसंत जिनिंग मध्ये यवतमाळ जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून संचालक पदी निवड करण्यात आली. अंकुश माफूर हे भालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, बोरी (खू) ग्रामपंचायतचे सदस्य आहे. तर ते मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची सर्वानुमते निवड जाहीर होताच त्यांच्यावर संपूर्ण मारेगाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
श्री. माफूर यांनी आपल्या निवडीचे श्रेय काँग्रेस नेते वामनराव कासावार बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांना दिले. तर सर्व वसंत जिनिंगचे संचालक मंडळ व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मित्र परिवार यांचे आभार मानले.


मागील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला दिला काँग्रेसने न्याय.. मागील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला दिला काँग्रेसने न्याय.. Reviewed by सह्याद्री चौफेर on November 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.