सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : दि. २३ ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या वतीने कार्यकारिणी विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक कर्नल तेजेंद्रपाल त्यागी (वीरचक्र) यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्याचे महासचिव हरिश्चंद्र राठोड यांच्या हस्ते राज्य व विदर्भस्तरीय नवीन कार्यकारणी घोषित करून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यामध्ये अमरावती विभागासाठी विभागीय सचिव म्हणून मुस्कान जलील सैय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सैनिक संस्थेमध्ये कार्य करत असताना युवकांमध्ये सैनिकी गुणांचा प्रसार करून त्यांना राष्ट्र सेवेत कार्य करण्यासाठी प्रेरित करणे, माजी सैनिक व शहिदांच्या प्रति सन्मानाबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करणे, युवकांमध्ये राष्ट्राप्रति प्रेम आणि सन्मान रुजवणे हे सर्व कार्य राष्ट्रीय सैनिक संस्था करीत असते.राष्ट्रीय सैनिक संस्थेत १,००,००० लाखाहून जास्त सदस्य संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. यावेळी नियुक्त पदाधिकारी यांनी राष्ट्रसेवेत कार्य करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महासचिव श्री. हरिश्चंद्र ब. राठोड यांनी केले.
राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या विभागीय सचिव पदी मुस्कान सैय्यद यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 05, 2023
Rating: