भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना मुबलक विज पुरवठा द्या - मनसेचे रुपेश ढोके यांचा महावितरणला ईशारा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खरीपानंतर रब्बी हंगाम सुरु झाला आहेत. अशातच वीज वितरण कंपनीने अघोषित भारनियमन सुरू केले असल्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिकाला पाण्याची गरज असतानाच भारनियमन केले जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत. भारनियमन बंद करून तत्काळ कृषि पंपांना व गावठाण फिडर ला सुरळीत विज पुरवठा करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
तालुक्यात सद्यास्थितीमध्ये रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून शेतात चना, मिरची व इतर पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतू संबंधित विभागाकडून भारनियमन चालु केले असून ते कोणत्याही वेळी हा वीज पुरवठा खंडीत करून कधीही बंद करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके कोलमडून पडत आहे. असा आरोप तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांनी आज मंगळवारला दिलेल्या निवेदनातून केला आहे. 
गावठाण फिडरला सुद्धा भारनियमन लावून सामान्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा ट्रान्सफार्मर देण्यात आले नाही. त्यामुळे येत्या ८ दिवसात भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना मुबलक विज पुरवठा करावा. त्याचबरोबर मागण्या केलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर, विद्युत पोल व इतर सुविधा देण्यात याव्या, असे देखील निवेदनात नमूद असून वरील सर्व मागण्या आठ दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा गर्भीत ईशाराही मनसेचे रुपेश ढोके यांनी दिला.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, ता. उपाध्यक्ष उदय खिरटकर, मा.वि.अध्यक्ष रोहित हस्ते, कुं.वि. अध्यक्ष आदित्य बूच्चे तसेच चोपण शाखा अध्यक्ष देवेंद्र खिरटकर, गौरव आसेकर, व अजय जुनगरी आदी उपस्थित होते. 
भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना मुबलक विज पुरवठा द्या - मनसेचे रुपेश ढोके यांचा महावितरणला ईशारा  भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना मुबलक विज पुरवठा द्या - मनसेचे रुपेश ढोके यांचा महावितरणला ईशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.