सह्याद्री चौफेर | राजू डावे
शहरातील मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय, या महत्त्वाच्या कार्यालयासमोरील मुख्यता रस्ता मागील दोन ते तीन वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. रस्त्याची चाळणी होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सदर रस्त्यावरुन येरजाऱ्या करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास नाहक सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते पोटे यांची मागणी आहे.
परिणामी संबंधित विभागाने या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष देवून हा रस्ता अखेरच्या घटका मोजत असताना तातडीने रस्त्याची दुरुस्त करून नागरिकांना हा मुख्य मार्ग सुकर करावा, अशी मागणी दादाजी पोटे यांनी केली आहे. विशेष उल्लेखनीय की, त्यांनी ह्या रस्त्यासाठी अनेक आंदोलने केली. मागील वर्षी लोटांगण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले तरी सुद्धा शासन प्रशासनाने सदर रस्ता दुर्लक्षित करून आजतागायत रस्ता नादुरुस्त आहे. त्यामुळे पोटे यांनी अखेर काल "समाधी आंदोलन" करून प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, या आंदोलनाला कितपत यश येत,याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
त्या रस्त्यासाठी वणीत ह्यांचे समाधी आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 03, 2023
Rating: