सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील मार्डी परिसरातून जवळपास 200 ते 250 विद्यार्थी मारेगाव येथे विविध शाळा, कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी खासगी वाहनाने ये-जा करतात. मात्र, महामंडळाकडून एकसुध्दा बस फेरी नसल्याने विद्यार्थी तथा नागरिकांकरिता बस फेरी कायमची सुरु करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना (उद्धव बाबासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने वणी आगार प्रमुखांना देण्यात आले.
मार्डी परिसरातील विद्यार्थ्यानाचा वाढता आलेख पाहता, मोठ्या प्रमाणात संख्या आहेत. परंतु त्या मानाने विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यास महामंडळाची बस उपलब्ध नाही. मात्र, विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेऊन आपले नाईलाजाने ज्ञानार्जन घेत आहे, परंतु हे अवैध खासगी वाहतूक जीवघेणा ठरत असून नुकताच काही दिवसाआधी एका 10 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये दुःखद निधन झाले. यास जबाबदार कोण? तसेच मार्डी परिसरामधुन जवळपास 20 ते 22 गावामधील लोकांना शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यांची सुध्दा पुरती गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
सदर परिसरातील जवळपास 200 ते 250 विद्यार्थी मारेगाव येथील शाळा महाविद्यालयात येतात, संबंधीत शाळा-कॉलेज यांनी दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थी तथा नागरिकांसाठी महामंडळ बसची तत्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) मारेगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पुढे निवेदनात असेही म्हटलं आहे की, आमच्या दिलेल्या पत्राचा विचार केला गेला नाहीत व दिवाळी पुर्वी बसची व्यवस्था करण्यात आली नाही, तर अन्यथा चक्काजाम आंदोलन करू, दरम्यान उद्भवणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. यावेळी शिवसेना (उबाठा) चे डॉ. मनिष मस्की सह माजी पं स.सभापती, तथा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी तथा नागरिकांसाठी मार्डी-मारेगाव बस सेवा उपलब्ध करा - शिवसेना (उबाठा)
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2023
Rating: